आमचे विषयी
ठाणे वनवृत्ताच्या अखत्यारीत खालील जिल्हे / विभाग समाविष्ट आहेत; ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरीय, रायगड आणि पुणे जिल्हयाचा भाग.
भौगोलिकदृष्ट्या हा प्रदेश १७°५१' अक्षांश ते २०°२०' अक्षांश आणि ७२°४५' रेखांश ७३°४८' रेखांशा पर्यंत पसरले आहेत. या भागचे वर्षीक सरासरी तापमान किमान १४. अंश सेल्सिअस ते कमाल 38 अंश सेल्सिअस, तर मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सरासरी पाऊस २७१२ मिमी एव्ह्ढा असतो.
ठाणे वनवृत्ताच्या अधिकारक्षेत्रात येणारे जंगल क्षेत्र खालीलप्रमाणे आहे: (सर्व आकडे चौ.किमी मध्ये)
जिल्हा |
भौगोलिक क्षेत्र |
एकूण क्षेत्र |
टक्केवारी |
ठाणे |
९५५८ |
३८७९.५२ |
४०.५९ |
रायगड |
७१४८ |
१७४८.३२ |
२४.४६ |
मुंबई (शहर आणि उपनगर) |
६०३ |
८६.१० |
१४.२८ |
पुणे (भाग क्षेत्र) |
३६.९४ |
||
एकूण |
५७५०.८८ |
प्रशासकीय कारणास्तव ठाणे वनवृत्ताची विभागणी सहा विभागात करण्यात आले आहेत. या विभागंचे प्रमुख हे उप-वनासंरक्षक दर्जाचे आधिकारी आहेत. हे सहा विभाग खालील प्रामणे आहेत.
१) ठाणे, २) डहाणू, ३) शहापूर, ४) जव्हार, ५) अलिबाग, ६) रोहा
- ठाणे वनवृत्त - प्राथमिक उद्दिष्टे, मिशनचे मुख्य घटक
- ठाणे वनवृत्त - टीम
- ठाणे वनवृत्त - अखत्यारी (नकाशा) (Hi-Resolution, Detail Map 5.5Mb, pdf)
























